By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 07:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे राज्यपालांना भेटायला जात असतानाच, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, उद्धव ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य या बैठकीनंतर केलं. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असं ठामपणे सांगताना उद्धव म्हणाले की, भाजपकडूनही माझ्याशी संपर्क होत आहे. याचा अर्थ युतीचं मनोमीलन होणार का याची शक्यता पुन्हा एकदा वर्तवली जात आहे.
तिन्ही पक्ष माझ्या संपर्कात आहेत, असंही उद्धव म्हणाल्याचं समजतं. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमदारांना दिलासा देताना आणि विश्वास देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आपण कायदेशीर लढाई लढतो आहोत. खचून जाऊ नका, घाबरू नका, शिवसेनेचंच राज्य येणार."
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात कलम 356 लागू करण्याची शिफारस केल्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाली आणि महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक सुरू असतानाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रिट्रीत हॉटेलमध्ये आमदरांच्या बैठकीसाठी दाखल झाले.
काँग्रेस आघाडीच्या बैठकीत शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी सत्तेत यावं अशी सूचना राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढली असली तरी आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये राजकारणातले किंग शरद पवार यांनी मोठा डाव खेळत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घ्यावं असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून शिवसेने समोर ठेवण्यात आला.या सगळ्यात काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार आहे. पण जर असं झालं तर कुठेतरी राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते. कोणत्याही चुकीच्या धोरणानंतर काँग्रेस आपला पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने सत्तेत यावं असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. यावर आता काँग्रेसच्या सोनिया गांधी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं अद्याप ठ....
अधिक वाचा