By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2020 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनाच्या संकटकाळात राजकारण होऊ नये, यासाठी महापालिकेतील विरोधी पक्ष गप्प आहेत. मात्र, शिवसेनेकडून याचा फायदा उठवला जात असून महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) करण्यात आला आहे. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड आणि जम्बो सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचेही मनसेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात राजकारण करु नका. या संकटाशी आपण एकत्र लढू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र, आता त्यांच्याच पक्षाकडून महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. कोविड सेंटर आणि जम्बो सेंटरच्या कामात मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर करून स्वतः च्या मुलाच्या कंपनीला काम मिळवून दिले. साईप्रसाद किशोर पेडणेकर यांच्या कंपनीने गैरमार्गाने हे काम मिळवल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच आपण केलेला भ्रष्टाचार समोर येऊ नये यासाठी महानगरपालिका सभागृह चालू केले जात नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महानगरपालिका बंद का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसत नाही. ....
अधिक वाचा