ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेने वचननाम्यात 'आरे'चा उल्लेख टाळला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 12, 2019 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेने वचननाम्यात 'आरे'चा उल्लेख टाळला

शहर : मुंबई

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यामध्ये १० रुपयांत जेवण, रस्ते, विद्यार्थी एक्स्प्रेस आणि वीज दरकपात अशा अनेक आश्वासनांचा समावेश आहे. परंतु, मुंबईच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या 'आरे'चा कोणताही उल्लेख या जाहीरनाम्यात करण्यात आलेला नाही.

काही दिवसांपूर्वीच मेट्रो रेल्वेच्या नियोजित कारशेडसाठी सरकारकडून मोठ्याप्रमाणावर झाडे तोडण्यात आली होती. यावरून पर्यावरणवादी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. त्यावेळी आम्ही सत्तेत आल्यावर 'आरे'ला जंगल घोषित करू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.त्यामुळे आजच्या शिवसेनेच्या वचननाम्यात 'आरे'चा उल्लेख असणे अपेक्षित होते. मात्र, शिवसेनेच्या वचननाम्यात याचा पुसटसा उल्लेखही केलेला नाही. याविषयी विचारणा केली असता आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेनेकडून विभागनिहाय प्रादेशिक वचननामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये 'आरे'चा उल्लेख आहे. सर्वच प्रादेशिक मुद्द्यांना मुख्य वचननाम्यात स्थान दिले असते तर तो खूपच जाडजूड झाला असता.

आदित्य यांच्या या स्पष्टीकरणानंतरही पत्रकारांकडून 'आरे'विषयी प्रश्नांची सरबत्ती सुरुच राहिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चर्चेची सूत्रे हाती घेत म्हटले की, आरेसाठी एकट्या शिवसेनेला जबाबदार धरता येणार नाही. त्याऐवजी सर्व पक्षांना समोरासमोर बसवा आणि त्यांची भूमिका स्पष्ट करायला सांगा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मागे

शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...
शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...

शनिवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा स्व....

अधिक वाचा

पुढे  

खासगी संस्थेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही निवडणूक काम अनिवार्य - न्यायालय
खासगी संस्थेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही निवडणूक काम अनिवार्य - न्यायालय

खासगी तंत्रनिकेतनमधील शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक काम अनिवार्....

Read more