ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अरे नालायका, मग कोणाला मत देऊ? उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अरे नालायका, मग कोणाला मत देऊ? उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

शहर : मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना रोखण्यासाठी भाजपाला मत देऊ नका, असा प्रचार केला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेतला आहे. जे तुम्हाला सांगत आहेत ना तुम्ही याला मत देऊ नका त्यांना देऊ नका, त्यांना विचारा अरे नालायका मग मी कोणाला मत देऊ, असे सांगत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी भाषणात राज ठाकरेंचा उल्लेख करणे टाळले असले तरी या विधानाद्वारे त्यांनी राज यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमध्ये प्रचारसभा घेतली.  तर, यासभेत त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर हल्लाबोल केला.

जवान सीमेवर लढतायंत. सत्तेवर जर नेभळट सरकार आले तर परिस्थिती बिघडेल. नेतृत्व कचखाऊ असेल तर सैन्य काही करु शकत नाही. आदेश मिळाले नाही तर सैन्यदेखील काही करु शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शरद पवार यांनी राजीव गांधी यांना देखील दगा दिला होता. त्यावेळी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले होते, मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. कुठे गेला हिमालय कुठे गेले ? ते काळे तोंड.? असा सवाल त्यांनी शरद पवार यांना विचारला. सभेत त्यांनी राज ठाकरे यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, जे तुम्हाला सांगत आहेत ना तुम्ही याला मत देऊ नका त्यांना देऊ नका, त्यांना विचारा अरे नालायका मग मी कोणाला मत देऊ.  युतीला संपवण्यासाठी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. जो या देशाला आपला देश मानतो तो धर्माने कोणताही असो तो आमचा आहे, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.

 

मागे

राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात 
राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात 

राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईत खडी मशीन, जनता मार्केट येथे धडाडणार आहे. आज या त....

अधिक वाचा

पुढे  

निवडणूक चिन्हे हद्दपार झाल्याशिवाय खरी लोकशाही शक्य नाही,  - अण्णा हजारे
निवडणूक चिन्हे हद्दपार झाल्याशिवाय खरी लोकशाही शक्य नाही, - अण्णा हजारे

मतदान यंत्रावर उमेदवाराचा फोटो असल्याने आता पक्षाचे चिन्हे नको, अशी मागणी ....

Read more