ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'पीक विमा योजना एक घोटाळा आहे असं शिवसेना म्हणत असेल, तर शिवसेनाही त्याला जबाबदार'- नवाब मलिक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 06:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'पीक विमा योजना  एक घोटाळा आहे असं शिवसेना म्हणत असेल, तर शिवसेनाही त्याला जबाबदार'- नवाब मलिक

शहर : मुंबई

पीक विमा योजना हा एक घोटाळा आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. सरकारनं हा आरोप फेटाळला आहे. पण एक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष राज्यात स्वसत्तेत आहे. असं असताना त्यांनी सरकारवर केलेल्या या गंभीर आरोपाचे काय राजकीय अर्थ निघतात?

पीक विम्यासंबंधित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, "पीक विमा योजना हा एक मोठा घोटाळा आहे. या योजनेत बहुसंख्य शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत. ही योजना 'पंतप्रधान पीक विमा योजना' आहे, 'विमा कंपनी बचाव योजना' नाही."

 "सरकारनं शेतकऱ्यांसाठी म्हणून कंपन्यांकडे दिलेले पैसे यात कंपन्यांचा ठराविक हिस्सा वगळून उरलेले पैसे शेतकऱ्यांना दिलेच पाहिजे. सरकारनं हा पैसा कंपन्यांकडून परत घ्यावा आणि शेतकऱ्यांना द्यावा. शेतकऱ्यांचा पैसा खाणाऱ्या कंपन्यांना कडक शिक्षा हवी," अशी मागणी त्यांना केली आहे.

 पीक विमा योजना हा एक घोटाळा आहे, असं शिवसेना म्हणत असेल, तर या घोटाळ्यासाठी शिवसेनाही जबाबदार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

 

 

मागे

भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री
भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री

भाजपमध्ये देशात आणि सध्या राज्यात अनेक नेते येत आहे. विशेषतः काँग्रेस-राष्....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना श्रीनगरमधून परत पाठवण्यात आलं
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना श्रीनगरमधून परत पाठवण्यात आलं

काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे 11 व....

Read more