By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2024 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू आज खुला होणार आहे. परंतु या समारंभाच्या उद्धघाटन कार्यक्रमावरुन शिवसेनेचा ठाकरे गट नाराज आहे. शिवसेनेच्या या गटाने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जगातील हा सर्वात मोठा सागरी सेतू प्रकल्प आहे. परंतु या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमावर ठाकरे गटाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाची ही नाराजी निमंत्रण पत्रिकेत नाव नाही आणि निमंत्रण ऐनवेळी आल्यामुळे आहे. ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधींच्या भागात अटल सेतू असताना त्यांचे नाव नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी नाराज झाले आहेत.
ठाकरे गटाच्या नाराजीची दोन कारणे
शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन १२ जानेवारी रोजी होत आहे. मोदी नाशिक आणि मुंबई दौऱ्यात अनेक प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहे. मुंबईत अटल सेतूच्या कार्यक्रमाचे निमंत्रण शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार, खासदारांना ऐनवेळी देण्यात आले. तसेच निमंत्रण पत्रिकेत सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांची नाव नाही. यामुळे ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय
कार्यक्रमाचे निमंत्रण एनवेळी पाठवल्याने आणि निमंत्रण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाचे निमंत्रण येऊन सुद्धा न जाण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारींनी घेतला आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहीर हे या भागातील स्थानिक आमदार, खासदार आहेत. त्यानंतर कोणाचेही पत्रिकेत नाव नाही. यामधील काही जणांना गुरुवारी रात्री तर काही जणांना शुक्रवारी सकाळी निमंत्रण पत्रिका मिळाल्या आहेत.
मुंबई ते नवी मुंबई अंतर २० ते २२ मिनिटांत या सागरी सेतूमुळे पार करता येणार आहे. अटल सेतू प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण झाल्यानंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या सेतूवरुन दिवसभरात ७० हजार वाहने धावतील, असा दावा आहे.
पंतप्रधान मोदी आधी काळाराम मंदिरात दर्शन घेणार त्यानंतर ते गोदावरीची महाआ....
अधिक वाचा