ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलिसांवर विश्वास नाही.. राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिवसेनानेचा 'वॉच'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 09:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलिसांवर विश्वास नाही.. राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिवसेनानेचा 'वॉच'

शहर : मुंबई

महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळे वळण घेताना दिसत आहे. त्यात सत्तेचा तिढा आणखीच गुंतागुंतीचा झाला आहे. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. आता कोर्टाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेला भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ची भीती असल्याची चर्चा सुरू आहे. 'ऑपरेशन लोटस'च्या भीतीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेल ग्रँड हयातमध्ये हलवण्यात आले आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिवसेनानेचा 'वॉच'

राष्ट्रवादीचे आमदार फुटणार तर नाही ना, याचीही भीती शिवसेनेला सतावते आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या आमदारांवर पहरा ठेवला आहे. पोलिसांवर विश्वास नसल्याने शिवसेना पक्षप्रमुखांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिवसैनिकांकडे सोपवली आहे. विभाग प्रमुखांसह स्थानिक नगरसेवकांना हॉटेल ग्रॅंड हयातमध्ये तैनात करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात तर नाही ना, यावर शिवसैनिकांचे लक्ष ठेवून आहेत.

महाविकासआघाडीकडे बहुमत असताना आणि सत्तास्थापनेचा दावा करणार असताना आधीच भाजपने शपथविधी उरकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने शपथविधीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत तर 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्यानं भाजपनं 120 आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. बहुमताचा आकडा 145 असल्यानं त्यांना आणखी आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑफरेशन लोटस मोहीम आखण्यात आली आहे.

आमदार फुटण्याची भीती आता शिवसेनेलाही आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. 'भाजपकडे बहुमत आहे तर ते फोडफोडीचं राजकारण का करत आहेत? भाजपने सत्तेसाठी तत्व, नीतिमत्ता गुंडाळून ठेवली आहेत. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडून अजित पवार 25 ते 30 आमदार घेऊन येतील या भ्रमात फडणवीस मंडळ होते. मात्र अजित पवारांचे कथित बंड फसल्याने भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. अजित पवारांसोबत 12 आमदार आले होते. मात्र त्यापैकी 9 आमदारांनी अजित पवारांचा हात सोडून पुन्हा शरद पवारांना साथ दिली. भाजपच्या व्यापारी वृत्तीमुळे आणि फसवणुकीच्या कलेमुळे त्यांनी शिवसेनेसारखा मित्र गमावला आता एखाद्या अट्टल चोराप्रमाणे रात्रीच्या अंधारात आमदार फोडफोडीचं राजकारण करीत आहेत.' शिवसेनेनं भाजपवर सामनाच्या आग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. असं असलं तरीही शिवसेनेलाही आमदार फुटण्याची भीती आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि बहुमत चाचणीदरम्यान होणारं गुप्त मतदानावेळी आमदार फुटण्याची भीती शिवसेनेला आहे. त्यामुळे सेनेच्या गोटातही चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर सगळ्याच पक्षांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले आमदार हॉटेलमध्ये सुरक्षीत ठेवले आहेत. असं असलं तर कोण फुटणार याची चर्चा होतेय. राष्ट्रवादीतून बंडकरून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांची रविवारी अनेक आमदारांनी भेट घेतली. भाजपप्रणित अपक्ष आमदार रवी राणा यांनी रात्री अजित पवारांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, शिवसेनेचे अनेक आमदार अस्वस्थ असून ते फुटणार आहेत. लवकरच ते कळेल असंही त्यांनी सांगितलं. रवी राणा यांच्या शिवाय अनेक आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. यात भाजपच्याही आमदारांचा समावेश होता.

 

मागे

'रात्रीस खेळ चाले' पार्ट – 2
'रात्रीस खेळ चाले' पार्ट – 2

राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये पुन्हा एकदा रात्रीची खलबतं झ....

अधिक वाचा

पुढे  

कोर्टात नव्या सरकारला धक्का देण्यासाठी शरद पवारांनी टाकला डाव
कोर्टात नव्या सरकारला धक्का देण्यासाठी शरद पवारांनी टाकला डाव

राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्था....

Read more