ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2019 06:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

शहर : मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना भाजपशी युती करता स्वबळावर लढणार, असे संकेत मिळत आहे.

सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या सुकाणू समितीची (कोअर) बैठक सुरु आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे नेते उपस्थित आहेत. यावेळी शिवसेनेसोबतच्या युतीचा निर्णयही होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेने हा निर्णय होण्यापूर्वीच आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपकडूनही आज संध्याकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या यादीत संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर(कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहुवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे.

मागे

२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान
२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान

राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्....

अधिक वाचा

पुढे  

तानाजी सावंत  यांच्या गाडीने तरुणाला उडविले
तानाजी सावंत  यांच्या गाडीने तरुणाला उडविले

शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीने सोलापूरातील बार्शीजवळील शेलगाव ....

Read more