By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 07:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेनेकडून सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, आदेश बांदेकर या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ आणि ७ अपक्ष अशा १६२ आमदारांचे संख्याबळ असल्याचे पत्र राज्यपालांना दिले. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी फुटली असून महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार, हे स्पष्ट झाले आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या पालखीतही शिवसैनिकच बसणार, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेसने सत्तेत सहभागी न होता शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सरकार चालवतील. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कमालीची बदलणार आहेत.
परंतु, आता राजभवनातील सूत्रांद्वारे नवी माहिती समोर आली आहे. त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठवलेली पाठिंब्याची पत्रे अजूनही राजभवनापर्यंत पोहोचलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने फॅक्सने तर काँग्रेसनेही ई-मेलद्वारे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना पाठवल्याचे सांगितले जाते. मात्र, काँग्रेसच्या पत्रात शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा उल्लेख नसल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला आहे.
Maharashtra: Shiv Sena leader Aaditya Thackeray and other leaders of the party reach Raj Bhavan, in Mumbai. pic.twitter.com/6dL1yiMm9C
— ANI (@ANI) November 11, 2019
भाजपने रविवारी सत्तास्थापन करण्यास नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी विचारणा केली होती. यानंतर काल संध्याकाळपासून मुंबई आणि दिल्लीतील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला होता. उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तर शिवसेना नेत्यांचे एक शिष्टमंडळ काँग्रेसशी चर्चा करायला दिल्लीत पोहोचले होते. आज सकाळपासूनच काँग्रेसच्या गोटात विविध बैठकांचे सत्र सुरु होते. अखेर संध्याकाळी उशीरा सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दर्शवला. यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांचे शिष्टमंडळ राजभवनात पोहोचले. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र फॅक्सने राजभवनावर पाठवले. तर काँग्रेसनेही आमदारांच्या पाठिंब्याचा पत्र राजभवनावर मेल केले. त्यामुळे शिवसेनेचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपची युती जवळपास तुटलीच आह....
अधिक वाचा