ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवथाळीसाठी आधारकार्ड सक्ती: ही तर गरिबांची थट्टाच 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 12:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवथाळीसाठी आधारकार्ड सक्ती: ही तर गरिबांची थट्टाच 

शहर : मुंबई

       मुंबई - येत्या २६ जानेवारीपासून राज्यात १० रुपयात थाळीचा लाभ ही योजना सुरू केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधारकार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. यामध्ये मुंबईतील १५ ठिकाणांचा समावेश असून १० रुपयात थाळी केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून शहरी भागात ३५ रुपये, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान दिले जाणार आहे. तथापि या शिवथाळीसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. तुमचा चेहरा आणि फोटो जुळला तरच या योजनेचा लाभ घेता येईल, अशी अट आहे. ही अट म्हणजे गरिबांची थट्टाच असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.

 

        शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या शिवथाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी,  १ मूद भात आणि १ वाटी वरण असेल. ही जेवणाची थाळी प्रत्येकाला दहा रुपयांना मिळणार आहे. दुपारी १२ ते २ या दोन तासात शिवथाळी उपलब्ध असेल. मुंबई शहर आणि उपनगरासाठी दिवसाला १९५० शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याला  २५०, ठाण्याला १३५०, औरंगाबादला ५००, पुण्याला १००० तर पिंपरी चिंचवडला 500 थाळी मिळणार आहेत.

 

       सरकारच्या या निर्णयाबद्दल बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, ही योजना गरिबांना केंद्रस्थानी ठेवून सुरु करण्यात आली आहे. योग्य व्यक्तींना योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे.त्यामुळेच थाळी मिळवण्यासाठी आधार कार्ड दाखवण्याची अट घालण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. सुरुवातीला राज्यात ५० ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु करण्यात येणार आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून योजनेचा विस्तार केला जाईल, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
 

मागे

मला नाईट लाईफ हा शब्दच मुळात आवडत नाही : उद्धव ठाकरे
मला नाईट लाईफ हा शब्दच मुळात आवडत नाही : उद्धव ठाकरे

            मुंबई : ''मला नाईट लाईफ'' हा शब्दच मुळात आवडत नाही. पण तर....

अधिक वाचा

पुढे  

भाजपची सत्ता असलेल्या नागपूर पालिकेत तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी बदली
भाजपची सत्ता असलेल्या नागपूर पालिकेत तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी बदली

          नागपूर : नागपूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. तथाप....

Read more