ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदींनी चुकवले शिवाजी महाराजांचे नाव- कॉंग्रेसचा टोला

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 11:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदींनी चुकवले शिवाजी महाराजांचे नाव- कॉंग्रेसचा टोला

शहर : मुंबई

मुंबईमध्ये काल राञी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी मोदी यांनी छञपती शिवाजी महाराजांचे नाव चुकविल्याने विरोधकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे नेहमी जेथे जातील त्या भुमीतील थोर व्यक्ती, देवी देवतांचे नाव घेऊन भाषणाला सुरुवात करतात. तर, महाराष्ट्रात आले की ते कधीही छञपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. मात्र, कालच्या मुंबईतील प्रचारसभेत त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव चुकवले आणि विरोधकांच्या रडारवर आले. मोदींनी मुंबादेवीच्या आशिर्वादाने भाषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणण्याऐवजी छत्रपती शिवराज महाराज असे उच्चारले. यावेळी ही चूक त्यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी भाषण तसेच पुढे सुरु ठेवल्याने विरोधकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही नीट घेता येत नसल्याची टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली. तसेच मोदींनी स्वत:ला मावळा म्हणण्याऐवजी मावला म्हटल्यावरही त्यांनी टोला लगावला. शिवरायांचा मावळा कधीच छत्रपती शिवराज महाराज म्हणणार नाही, असे ट्विट त्यांनी केले. तर, महत्वाचे म्हणजे भाजपाचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्र्यांचे नाव शिवराज सिंह चौहाण आहे. आणि मोदी हे मध्य प्रदेशमधील सिधी आणि जबलपूर येथे दोन प्रचारसभांना संबोधित करून आले होते. 

 

मागे

लोकसभा निवडणूक २०१९ : आयुष्यात मैदान न पाहिलेल्यांनी आम्हाला शिकवू नये
लोकसभा निवडणूक २०१९ : आयुष्यात मैदान न पाहिलेल्यांनी आम्हाला शिकवू नये

लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचार रणधुमाळीत शिवसेना - भाजपच्या टार्गेटवर आहे....

अधिक वाचा

पुढे  

 महाराष्ट्रातील निवडणुकीच्या राजकीय तोफा आज थंडावणार
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या राजकीय तोफा आज थंडावणार

महाराष्ट्रात निवडणुकीच्या आरोप्रत्यारोपांच्या जोरदार फैऱ्या झाल्यावर आ....

Read more