ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पवारांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो - संजय राऊत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 06:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पवारांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो - संजय राऊत

शहर : मुंबई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी व्यक्तीगत आणि कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. गेले काहीदिवस जे चालले आहे. त्याबद्दल त्यांची भेट घेतली. बाकी काही नाही, असे शिवसेने नेते संजय राऊत म्हणालेत.

अजित पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी आमदारकीचा राजीनामा दिला त्यामुळे महाराष्ट्रातले राजकारण ढवळून दिले. त्यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला याचीच जोरदार चर्चा सुरु होती. आज अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, शरद पवारांचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी काहीही संबंध नसताना त्यांना यात गोवले गेले आहे. असे अजित पवार म्हणालेत. तसेच पवार यांनीही तसे स्पष्टीकरण दिले. मात्र, ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याने राज्यातील राजकारण तापले. राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केले. तर पवार ईडी कार्यालयात जाणार असे जाहीर केले आणि ते निघार एवढ्यात त्यांनी ईडी कार्यालयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून भेट रद्द केली. त्यानंतर शिसेनेने त्यांची बाजू घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये काय चर्चा सुरु झाली, त्याची माहिती संजय राऊत यांनी दिली नाही. मात्र, मोजकेच बोलून भाष्य टाळले. मात्र अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

 

मागे

राज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार
राज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार

राज्याच्या राजकारणात मोठी बातमी घडली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ....

अधिक वाचा

पुढे  

२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान
२५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करूनच दाखवा; पृथ्वीराज चव्हाणांचे आव्हान

राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्....

Read more