ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपाची सत्ता असलेल्या पालिकेत शिवसेनेचा महापौर ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 20, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपाची सत्ता असलेल्या पालिकेत शिवसेनेचा महापौर ?

शहर : मुंबई

भाजप आणि शिवसेना युतीमधील वादाचा फटका मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये बसणार आहे. भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत शिवसेनेनं आपला महापौर बसवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे महाशिवआघाडी उभारण्याचा प्रयत्न कसोशीने केला जातो. महापौरपदासाठी आतापर्यंत 15 इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. त्यामध्ये नऊ जण भाजपचे नगरसेवक आहेत. तर सेनेच्या चार काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी एका नगरसेवकाने महापौरपदासाठी अर्ज नेले आहेत.

उपमहापौर पदासाठी 15 नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामुळे एकूणच या ठिकाणीही महापौरपदावरून वाद रंगलाय. महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार असून भाजपपुढे सत्ता राखण्याचं आव्हान आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार आहे. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही भेट होणार आहे. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पवार मोदींना भेटणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे खासदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलं होतं. मात्र यात कोणताही राजकीय ट्वीस्ट असल्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली.

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद

आघाडीची बैठक होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी मिळावे ही राष्ट्रवादीची भूमिका  कायम आहे. पहिले अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि नंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादीला मिळावे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. शिवसेनेचे 56 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत, यात फारसा फरक नसल्यानेच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. राष्ट्रवादीच्या आज दुपारच्या बैठकीत यावर पुन्हा चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी काँग्रेसबरोबरच्या बैठकीतही यावर चर्चा होईल.

 

 

मागे

शरद पवार यांना भाजपकडून थेट राष्ट्रपतीपदाची ऑफर
शरद पवार यांना भाजपकडून थेट राष्ट्रपतीपदाची ऑफर

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर ....

अधिक वाचा

पुढे  

"सावरकरांच्या 'भारतरत्न'ला नेहमीच विरोध करत राहणार" - खासदार हुसेन दलवाई

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची माग....

Read more