By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 26, 2019 11:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नुकत्याच झालेल्या विधानसभी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे सर्व 56 आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे. या बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही वरळीचे आमदार म्हणून उपस्थित असणार आहेत.
शिवसेना पक्षाचा विधिमंडळ गटनेता कोण असावा, या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची भुमिकाही आज उद्धव ठाकरे नव्या आमदारांसमोर स्पष्ट करणार आहेत. गेली पाच वर्षे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उत्तम फ्लोअर मॅनेजमेंट दाखवले होते. आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही आमदार म्हणून विधिमंडळात उपस्थित असणार आहेत. तसेच त्यांनाच शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचीही गटनेतेपदी नियुक्ती होऊ शकते. आणि तसे झाले तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असतील. शिवसेनेच्या बैठकीत यासंदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख नव्या आमदारांसोबत काय निर्णय घेतायेत याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप 'बॅकफूट'वर.. शिवसेनेकडून दबावतंत्राचा वापर
'अबकी बार 220 पार' हा निर्धार पूर्ण करू न शकल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे. सत्तास्थापनेसाठी मदत करताना शिवसेनेकडून भाजपवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. 2014 मध्ये भाजपने दुय्यम वागणूक दिल्याची खंत अजूनही शिवसेनेच्या मनात आहे. ती कसर भरून काढण्यासाठी शिवसेनेने आता लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण भाजपला करून दिली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर भाष्य करणे अनेकदा टाळले होते. मात्र, निवडणुकीचे निकाल जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याची भाजपला आठवण करून दिली. त्याच प्रमाणे यावेळी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता.
1995च्या सूत्रानुसार सत्तावाटप..
लोकसभा निवडणुकीच्या वेळीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत विधानसभेला 1995 च्या सूत्रानुसार सत्तावाटप होईल, असे ठरल्याचे सेनेच्या सूत्रांनी सांगितले. तो शब्द आता भाजपने पाळावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेतून होत आहे. 2014 मध्ये मात्र फडणवीस यांनी शिवसेनेला ना उपमुख्यमंत्रिपद दिले ना गृहमंत्रिपद. जलसंपदा, बांधकाम, अर्थमंत्री खातीही भाजपकडेच होती. सेनेला पर्यावरण, परिवहन यासारखी दुय्यम खाती दिली. 1995 मध्ये राज्यात युती सरकार असताना धाकटा भाऊ असलेल्या भाजपला तेव्हा जी महत्त्वाची खाती दिली होती, तीच खाती आता 'धाकट्या'च्या रूपात असलेल्या शिवसेनेला हवी आहेत.
असे होते 1995 चे सूत्र
-1995 च्या निवडणुकीत शिवसेनेने 73 तर भाजपने 65 जागा जिंकल्या होत्या
-मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर भाजपला उपमुख्यमंत्रिपद
-दोन्ही पक्षांचे 14-14 कॅबिनेट मंत्री होते.
विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक निकाल समोर आले. परळी मतदारसंघात ....
अधिक वाचा