By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2019 02:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरू असतानाच शिवसेनेतही लवकरच इच्छुकांचा मोठ्या संख्येत प्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज असलेले काही जण शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कुटुंबातील राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक आणि त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे. तर मुंबईतील मालाडचे विद्यमान आमदार असलम शेख शिवसेनेत जाणार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसकडून घेतल्या जात असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत कोण इच्छुक आहेत याची चाचपणी करीत आहेत. त्यासाठी घेण्यात आलेल्या सर्व मुलाखतीला कृपाशंकर सिंह, वर्षा गायकवाड, अमित पटेल आलेच नाहीत. त्यातील कृपाशंकर सिंग भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे.
ऑगस्ट पर्यंत 50 आमदार प्रवेश करण्याची शक्यता आजपासून मुख्यमंत्री देवेंद्....
अधिक वाचा