ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद; 'मातोश्री'कडून अरविंद सावंत यांच्या नावावर मोहोर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 30, 2019 12:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद; 'मातोश्री'कडून अरविंद सावंत यांच्या नावावर मोहोर

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर गुरुवारी दिल्लीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी नव्या मंत्र्यांचा शपथविधीही पार पडेल. त्यामुळे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातून १८ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला एक मंत्रिपद मिळणार आहे. यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका खासदाराचे नाव सुचविण्यास सांगण्यात आले होते. यानंतर उद्धव यांनी अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा एका लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते आहेत. त्यामुळेच सावंत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेकडून राज्यसभा सदस्य अनिल देसाई, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आणि यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अखेर मंत्रिपदासाठी सावंत यांचे नाव निश्चित करण्यात आले.दरम्यान, महाराष्ट्रातील भाजप खासदारांपैकी मंत्रिपदावर नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर रामदास आठवले यांचेही मंत्रिपद निश्चित मानले जाते. सुभाष भामरे यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल का, याची उत्सुकता आहे. हंसराज अहिर पराभूत झाले असले, तरी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

 

मागे

मोदी सरकारमध्ये सुभाष भामरेंची मंत्रिपदी  वर्णी लागेल की नाही? धुळ्यात शुकशुकाट
मोदी सरकारमध्ये सुभाष भामरेंची मंत्रिपदी वर्णी लागेल की नाही? धुळ्यात शुकशुकाट

आज शपथ घेणाऱ्या मोदी सरकारमध्ये मंत्रिपदी कोणाची वर्णी लागेल? याबाबत किती ....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद द्यायला हवे होते- संजय राऊत
शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद द्यायला हवे होते- संजय राऊत

मोदी सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ शपविधीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाज....

Read more