By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 04:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शेतकर्यांसंबंधीची जी काही प्रकरणे आहेत ती विमा कंपन्यांनी आणि बँकांनी 15 दिवसात निकाली काढावी. अन्यथा 16 व्या दिवसापासून शिवसेना स्टाइल ने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने शेतकर्यांसाठी विमा कंपण्याविरोधात वांद्रे येथील बीकेसी मैदानावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई अनिल देसाई, खासदार विनायक राऊत , महापौर विश्वनाथ महाडेश्वर , रामदास कदम, यांच्यासह अनेक शिवसेनेचे खासदार आमदार व नगरसेवक शिवसैनिक उपस्थित होते. वांद्रे कुर्ला संकुल येथील 'भारती अक्सा' या खाजगी विमा कंपनी च्या कार्यालयासमोर मोर्चा आल्या नतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि , "आम्ही ज्यांचं खातो, त्यांना जागतो. मुंबई साठी रक्त सांडणार्या शेतकर्यांसाठी आपण बांधील आहोत. मोठ मोठे लोक देश सोडून गेले. माझा शेतकरी देह सोडून जातो . या शेतकर्यांच्या पीक विम्याची प्रकरण 15 दिवसात सोडवा, अन्यथा 16 व्या दिवसापासून शिवसेना स्टाइल ने ऊतर देऊ ", असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्या व बँकांना दिला.
बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षाणीच निर्णय द्यावा. त्या....
अधिक वाचा