By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2019 01:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साताऱ्यातील वाई मतदारसंघाचे शिवसेना नेते पुरूषोत्तम जाधव यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. शिवसेनेच्या हक्काचा वाई विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोडल्याने पुरुषोत्तम जाधव आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असा निर्धार पुरुषोत्तम जाधव यांनी केलाय.
पुरुषोत्तम जाधव हे उदयनराजेंच्या विरोधात दोन वेळा लोकसभा निवडणुक लढले होते. २००९ आणि २०१४ साली उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणुक लढुन जवळपास अडीच लाख मतं मिळवली होती. यामुळे शिवसेनेने त्यांना २०१९ ला सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी मतदारसंघ नरेंद्र पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.
आता विधानसभेला देखील वाई मतदारसंघ भाजपाला सोडल्याने आमच्यावर अन्याय केला जात असल्याची खंत व्यक्त करत बंडखोरी करून वाई विधानसभेला आणि सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीला उमेदवारी देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे
स्वत:वर झालेला अन्याय किती वेळा सहन करायचा आशा पद्धतीच्या भावना परुषोत्तम जाधव यांनी बोलुन दाखवत. आता शांत बसणार नसुन कोणत्याही परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. पुरुषोत्तम जाधव यांच्या या निर्णयाने शिवसेना-भाजपाच्या महायुतीच्या गोटात खळबळ उडाली असुन जाधवांच्या या बंडाळीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि वाई विधानसभा मतदारसंघात भाजपचे मदानदादा भोसलेंच्या अडचणी वाढणार हे निश्चित झाले आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर....
अधिक वाचा