ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मातोश्रीवर ठरणार नव्या सरकारचं भवितव्य,शिवसेना किंग होणार की किंगमेकर?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 25, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मातोश्रीवर ठरणार नव्या सरकारचं भवितव्य,शिवसेना किंग होणार की किंगमेकर?

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला 220 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात 2014 च्या तुलनेत जागा कमी झाल्या. भाजपचे नेते स्पष्ट बहुमत मिळेल असं म्हणत होते. मात्र, त्यांना 40 जागा कमी पडल्या. यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेवर अवलंबून रहावं लागणार आहे.

निकालानंतर आता सर्वांचं लक्ष शिवसेनेच्या भुमिकेकडे लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी खुली ऑफर दिली आहे. तर स्पष्ट बहूमतापासून ४० जागा दूर राहिलेल्या भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे. सत्ता स्थापन करण्यापासून ते चालवण्यापर्यंत सेनेची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ५६ जागा जिंकलेली शिवसेना किंगमेकर बनलीय. आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे विजयी उमेदवार शनिवारी मातोश्रीवर येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्व विजयी उमेदवार आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये घेण्यात येणाऱ्या निर्णयावर महाराष्ट्रात पुढच्या पाच वर्षातलं राजकारण ठरणार आहे. आता भाजपसोबत युतीधर्म पाळून किंगमेकर व्हायचं की किंग होण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी करायची याचाच निर्णय मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत होईल.

निवडणुक निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले. त्याचवेळी भाजपलाही सूचक इशारा दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची भाजपला आठवणही करून दिली. दोनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. पारदर्शकपणे चर्चा करतील आणि तोडगा काढतील असंही त्यांनी सांगितलं. आधी सत्तेचं वाटप ठरेल नंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा भाजपला इशारा नसून लोकसभेच्या वेळी जे ठरलं त्याची फक्त आठवण करून देतो असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुणाही एका व्यक्ती किंवा पक्षाभोवती प्रचार केंद्रीत राहू नये. जनतेनं अत्यंत जागरूकपणे मतदान केलंय. त्यांनी विरोधी पक्ष जिवंत ठेवलाय. काही जण गृहीत धरून चालतात त्यांनाही जनतेनं योग्य तो संदेश दिलाय असा टोलाही त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला. सत्ता स्थापनेही मला घाई नाही असंही त्यांनी सांगितलंय. भाजपने जागावाटपावेळी अडचण आहे म्हणून सांगितलं. मात्र प्रत्येकवेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. गरज पडली तर अमित शहाही चर्चेला येतील असंही ते म्हणाले.

 

 

मागे

निवडणूक निकालानं शिवसेना-भाजपचा अपेक्षाभंग
निवडणूक निकालानं शिवसेना-भाजपचा अपेक्षाभंग

निवडणूक निकालानं भाजपा आणि शिवसेना दोघांचाही अपेक्षाभंग केला आहे. युतीनं स....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवारांनी मैदान गाजवलं पण ….
शरद पवारांनी मैदान गाजवलं पण ….

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता होत....

Read more