ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य यात्रे'ची धुरा डॉ.अमोल कोल्हेंकडे

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य यात्रे'ची धुरा डॉ.अमोल कोल्हेंकडे

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्यानंतर छोट्या पडद्यावरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांची भूमिका वठविणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा होती. त्याप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात 'शिवस्वराज्य यात्रा' काढण्याचे ठरवले असून या यात्रेची धुरा डॉ.कोल्हे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे

युवासेनेच्या आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद यात्रा' आणि मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश यात्रे'ला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने डॉ. कोल्हेंसारखा मोहरा पणाला लावल्याचे म्हटले जात आहे. 'शिवस्वराज्य यात्रे'त ठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून खासदार उदयनराजे भोसले देखील सहभागी होणार आहेत. या यात्रेला छत्रपती शंभू शिवरायांची जन्मभूमी जुन्नर येथून येत्या सहा ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे.

'शिवस्वराज्य यात्रा' दररोज तीन विधानसभा मतदारसंघात जाईल. या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर सोपवण्यात आली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजे बुलढाणा येथील सिंदखेडराजा येथे संपेल. 16 ऑगस्ट रोजी या यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल आणि या यात्रेची सांगता रायगड वर होणार आहे.  दरम्यान उद्या 1ऑगस्टपासून भाजपाची 'महाजनादेश यात्रा' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. या यात्रेच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथून या यात्रेस प्रारंभ होणार आहे.

 

 अशाप्रकारे शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यात्रा करून जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस अशी यात्रा काढणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मागे

सरपंचांच्या मानधनात वाढ
सरपंचांच्या मानधनात वाढ

राज्य सरकारने ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार सरपंचांना महिन....

अधिक वाचा

पुढे  

नवनीत कौर राणांनी केली धूर फवारणी
नवनीत कौर राणांनी केली धूर फवारणी

 अमरावती मधील युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार नवनीत कौर राणा आपल्या मतदा....

Read more