By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 04:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणूक प्रचारातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं वातावरण तापलेलं असतानाच आज भाजपचे प्रवक्ते जीवीएल नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट फेकण्यात आला. साध्वी प्रज्ञा यांचा भाजपप्रवेश व त्यांना भोपाळमधून देण्यात आलेल्या उमेदवारी संदर्भात माहिती देत असताना हा प्रकार घडला. संबंधित व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात ही घटना घडली. बूट फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव शक्ती भार्गव असं असून तो व्यवसायानं डॉक्टर असल्याचं समजतं. भार्गव यानं बूट फेकल्यानंतरही राव यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पत्रकार परिषद सुरूच ठेवली.
राहाता येथे मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या ठिकाणी बंदोबस्तास असल....
अधिक वाचा