By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 05:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांमध्ये आवक जावक चालू आहे. त्यातच एक नाव श्रद्धा जाधव यांचं घेतलं जात आहे. शिवसेनेच्या माजी महापौर म्हणून त्यांनी ह्या अगोदर पदभार सांभाळला होता. सध्या मोठ्या प्रमाणात शीवेना आणि बीजेपी मध्ये मोठ्या नेत्यांची भरती चालू आहे. श्रद्धा जाधव यांचा वडाला विधान सभा मतदार संघ भाजप कडे जाईल अशी शक्यता आहे. त्यातच अजून युतीची घोषणा ही झाली नाही त्यामुळे दोन्ही नाराज पक्षातील नाराज इच्छुक उमेदवार व सदस्य पक्ष बदल करत असल्याचे दिसत आहे.
यातच शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती आहे.शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी श्रद्धा जाधव यांनी खासदार राहुल शेवाळेंसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली आहे.
वडाळा विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास श्रद्धा जाधव बंडाच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले कालिदास कोळंबकर यांच्याही अडचणीत यामुळे वाढ होण्यची शक्यता आहे. वडाळा मतदारसंघात कालिदास कोळंबकर यांचा चांगला जनसंपर्क आणि प्रभाव असून आतापर्यंत सात वेळा सलग निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ ते सोडण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामूळे युती झाल्यास ह्या मतदार संघातून कोण निवडणूक लढविणार हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.
राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी घेतलेल्या मेळाव्यात सध्या सुरू अस....
अधिक वाचा