By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 04:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी भाजपमध्ये दाखल झाले. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल हेदेखील यावेळी उपस्थित होते. दिल्ली कार्यालयात दलेर मेहंदी यांचा पक्षप्रवेश पार पडला. या दरम्यान उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजप उमेदवार हंसराज हंस, केंद्रीय मंत्री आणि चांदणी चौकचे उमेदवार हर्षवर्धन तसेच पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी हंसराज हंस भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांनंतर भाजपानं त्यांना उत्तर पश्चिम दिल्ली मतदार संघातून तिकीट देऊन मैदानात उतरवलं आहे. दलेर मेहंदी हे हंसराज हंस यांचे व्याही आहेत. हंसराज हंस यांचा मुलगा नवराज हंस आणि दलेर मेहंदी यांची मुलगी अवजीत कौर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. १९९५ साली आलेल्या 'बोलो ता रा रा' अल्बममुले दलेर मेहंदी प्रकाशझोतात आले होते.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या चौथ्या टप्प्यातील प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. आज....
अधिक वाचा