By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 05:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि निर्मोही आखाड्यासहीत इतरांनी दाखल केलेल्या सर्व १८ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे अखेर अयोध्या खटला बंद झाला आहे.
संपूर्ण देशाचं लागून राहिलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचं सांगतानाच सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद उभारण्यासाठी पाच एकर जागा देण्याचे निर्देश दिले होते. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पक्षकारांकडून ९ आणि इतरांकडून ९ अशा एकूण १८ पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांचा गुणवत्तेच्या आधारे विचार करून त्या फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. या घटनापीठात न्यायामूर्ती डी.वाय. चंद्रचूड, अशोक भूषण, एस. अब्दूल नजीर आणि संजीव खन्ना यांचा समावेश आहे.
अयोध्येच्या वादग्रस्त खटल्यावर सुप्रीम कोर्टाने आपला अंतिम निकाल सुनावला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अयोध्येची वादग्रस्त जागा ही 'रामलल्लाची'च असल्याचा निकाल कोर्टाने दिला आणि इतरांनी दाखल केलेल्या सर्व १८ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
मुंबई – महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन पंधरा दिवस उलटले. अजू....
अधिक वाचा