ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 07:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

शहर : delhi

गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव करण्याची किमया करून दाखवली. राहुल यांनी काही वेळापूर्वीच अमेठीतील आपला पराभव मान्य केला. यानंतर स्मृती इराणी यांनीही ट्विटरवरून दुष्यंत कुमार यांचा एक उर्दू शेर लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्मृती इराणी यांच्या आजच्या विजयाने अमेठी मतदारसंघातील गांधी घराण्याचे वर्चस्व अनेक दशकांचे वर्चस्व मोडीत निघाले आहे. या विजयाला समर्पक असा हा शेर आहे."कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता" ...

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपला पराभव मोठ्या मनाने मान्य केला. त्यांनी म्हटले की, मला अमेठीवासियांचा निर्णय मान्य आहे. मी स्मृती इराणी यांना इतकेच सांगू इच्छितो की, त्यांनी आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवावा, असे राहुल गांधी म्हटले.

लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपप्रणित एनडीएने ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ३०० पेक्षा अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) १०० पेक्षा कमी जागा मिळतील, असे चित्र दिसत आहे.

मागे

हातकणंगले मतदारसंघात धक्कादायक निकाल,राजू शेट्टींचा पराभव करत धैर्यशील माने 'जायंट किलर'
हातकणंगले मतदारसंघात धक्कादायक निकाल,राजू शेट्टींचा पराभव करत धैर्यशील माने 'जायंट किलर'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा पराभव जवळपास निश्चित झ....

अधिक वाचा

पुढे  

Election Result 2019 : राहुल गांधी वायनाडमधून विक्रमी मतांनी विजयी
Election Result 2019 : राहुल गांधी वायनाडमधून विक्रमी मतांनी विजयी

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठीमधून पराभवाचा....

Read more