By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 26, 2019 04:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : पालघरमध्ये शिवसेनेकडून श्रीनिवास वानगा यांना डच्चू दिला असून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. पालघर लोकसभेसाठी युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. यावेळी गांवित हे कमळावर नव्हे तर शिवसेनेच्या धनुष्यबानावर लढणार आहेत. म्हणजेच ते युतीचे असले तरी शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. भाजपाचे खासदार राजेंद्र गावित यांनी अखेर शिवबंधन बांधले आहे. आताच झालेल्या पालघर निवडणूकीमध्ये ज्यांनी शिवसेनेवर त्यांनी भरपूर टीकाही केल्या. भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी गावित यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांना पक्षात प्रवेश केला.
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी एक गौप्यस्फोट केल....
अधिक वाचा