ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?', निलेश राणेंचा सरकारला संतप्त सवाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 03, 2020 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?', निलेश राणेंचा सरकारला संतप्त सवाल

शहर : सिंधदुर्ग

एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला? अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारला संतप्त सवाल विचारला आहे. एसटी कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या सरकारचा निषेध करतो असाही हल्लाबोल निलेश राणे यांनी केला आहे. खरंतर, मुंबईमधे बेस्ट प्रवाशी वाहतुकीसाठी महाराष्ट्र भरातून गेलेल्या एसटी प्रवाशांना सरकारने सुविधा पुरवल्या नसल्याच्या मुद्यावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. या कर्मचाऱ्यांना ना चांगली रहाण्याची सोय केली ना जेवणाची. जेवणामध्ये अळ्या मिळत आहे. त्यांची जिथे व्यवस्था केली ते शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचं हॉटेल आहे. या खात्याचे मंत्री अनिल परब आहेत. कोरोनासारख्या संकटामध्येसुद्धा हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून तिथे ड्यूटी करत आहेत. पण सरकार यांना काय देत आहे ? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या जेवणात किडे सापडतात. त्यांच्या राहण्याची सोय नाही. काल त्यांची मुले रस्त्यावर झोपली. ते कसेबसे आपला जीव वाचवून त्या क्वोरंटाईन सेंटरमधून आजही न्यायाची अपेक्षा करतायत. माञ सरकारला खरोखरच लाज वाटली पाहीजे असा घणाघात यावेळी निलेश राणे यांनी सरकारवर केला.

ते पुढे म्हणाले की, ‘सरकार चालवण्यासाठी उद्धव ठाकरे शभंर टक्के अपयशी आहेतच. हे आम्ही वेळोवेळी सांगतोय आता हे नवनवीन विषय बाहेर येतायत. खरोखरच महाराष्ट्राला न शोभणारी आणि अत्यंत दुखः देणारी ही घटना आहे. आमच्या मुलांना कर्मचाऱ्यांना रस्त्यावर झोपावं लागतं आहे. म्हणजे सरकारने त्यांना कामाला नेलं होतं की मरायला हा आमच्या समोर प्रश्न आहे आणि म्हणून मी या सरकारचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.

मागे

कोचिंग क्लास पुन्हा सुरु करा, कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला
कोचिंग क्लास पुन्हा सुरु करा, कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

राज्यातील ग्रंथालय सुरु झाल्यानंतर आता कोचिंग क्लास पुन्हा सुरु करण्यासा....

अधिक वाचा

पुढे  

मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने; कांजूरमार्गची जागा आमची, केंद्राचा दावा
मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने; कांजूरमार्गची जागा आमची, केंद्राचा दावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड का....

Read more