ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यपालांना विमान परवानगी नाकारली, नेमकं काय घडलं?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 12, 2021 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यपालांना विमान परवानगी नाकारली, नेमकं काय घडलं?

शहर : मुंबई

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज शासकीय विमानाने देहरादूनला आणि इथून कारने मसुरीला जाणार होते. यासाठी शासकीय विमानाची बुकींग करण्यात आल्याचं राज्यभवनातील सूत्रांनी सांगितलं. मात्र राज्यपाल विमानतळावर जाऊन शासकीय विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. राज्यपाल त्यांनंतर दुपारच्या १२ वाजून १५ मिनिटाच्या स्पाईसजेटच्या विमानाने देहरादूनला रवाना झाले. मसुरीला IAS प्रशिक्षण समारोप कार्यक्रमासाठी राज्यपाल उद्या हजर राहणार आहेत. त्या कार्यक्रासाठी त्यांना शासकीय विमान हवे होते.

- मुख्यमंत्री कार्यालयाने या दौऱ्याला मान्यता दिलेली नाही हे काल राजभवनाला कळवले देखील होते अशी माहिती आहे.

- राज्यपाल कोणत्याही दौऱ्याला जाताना विमान हवं असेल की महाराष्ट्र विमान प्राधिकरण कडे अर्ज केला जातो.

- महाराष्ट्र विमान प्राधिकरण राज्यपाल त्याचे दौरे आणि त्यांच्या अर्जाची माहिती मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे पाठवते.

- मुख्यमंत्री कार्यालय त्यानुसार मान्यता देतात आणि विमानाच्या प्रवासाला परवानगी मिळते.

- राज्यपालांनी आपल्या दौर्याबाबत गेल्या आठवड्यात महाराष्ट्र विमान प्राधिकरण कडे अर्ज केला होता.

- याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे देण्यात आली होती.

- पण राज्यपालांच्या देहराडून दौर्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाली नाही.

- मुख्यमंत्री कार्यालयाने या दौऱ्याला मान्यता दिलेली नाही हे काल राजभवनाला कळवले देखील होते अशी माहिती आहे.

- राज्यपाल विमानात बसल्यावर मान्यता नाही हे कळल्यावर मग सगळीकडे पुन्हा फोन फोनी सुरू करण्यात आली.

'राज्यपालांना विमानाची परवानगी दिली नव्हती तरी ते विमानात जाऊन बसल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या कठड्यात उभं करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे

मागे

VIDEO : राज्यसभेच्या शेवटच्या भाषणात गुलाम नबी गहिवरले, राज्यसभेत शांतता, आझाद फक्त बोलत राहीले
VIDEO : राज्यसभेच्या शेवटच्या भाषणात गुलाम नबी गहिवरले, राज्यसभेत शांतता, आझाद फक्त बोलत राहीले

काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा आज राज्यसभेतला शेवटचा दिवस ह....

अधिक वाचा

पुढे  

लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, शरद पवारांचा गंभीर आरोप
लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, शरद पवारांचा गंभीर आरोप

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, अस....

Read more