By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 06:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अनंत चतुर्दशीनंतर विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच राज्य शासनाने विविध निर्णय घेण्याचा धडकाच लावलेला दिसत आहे. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत तब्बल 25 निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विना अनुदानीत शाळा महाविद्यालये याबाबत निर्णय घेत हा विषय कायमस्वरूपी राज्यातून संपविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, शासकीय आश्रम शाळांमध्ये इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांमध्ये रूपांतर करणे , मुंबईत हैदराबाद विद्यापीठ स्थापन करणे, नाशिक मध्ये मेट्रो प्रकल्प राबविणे, जेष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दिड पट वाढ करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यापूर्वी 7 ऑगस्ट ला झालेल्या मंत्रिमंडळ 10 निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर 13 ऑगस्टच्या बैठकीत 12 निर्णय झाले. गेल्या आठवड्यात 19 निर्णय घेण्यात आले होते. हा रेकॉर्ड ब्रेक करीत आजच्या बैठकीत 25 निर्णयांवर शिक्कामोर्तब केले आहेत.
नांदेड जवळील डौर गावाचे संभाजी जाधव (46) शेतीवरील वाढत्या कर्जामुळे निराश हो....
अधिक वाचा