By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आंध्रप्रदेश : भारतामध्ये आंध्रप्रदेश तीन राजधान्य असलेले एकमेव राज्य म्हणून ओळखले जाणार आहे. आंध्रप्रदेशच्या तीन राजधान्यांचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. या विधेयकात विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी असेल, आणि अमरावती विधिमंडळाची राजधानी, तर आंध्रप्रदेशाची कुरनूल ही न्यायिक राजधानी असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
चर्चेदरम्यान, विरोधकांकडून गोंधळ घालणार्या आमदारांवर कारवाई करण्यात आली. या विधेयकाविरोधात माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन केले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
रेड्डी यांची नायडूंवर टीका
विधानसभेत विरोधकांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. त्यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करीत सांगण्याचा प्रयत्न केला की, ज्यांना जे हवं होतं तेच केलं.
मुंबई - नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात २४ जानेवारीला राज्य....
अधिक वाचा