ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सीएए विरोधात २४ जानेवारीला राज्यव्यापी बंद

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 05:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सीएए विरोधात २४ जानेवारीला राज्यव्यापी बंद

शहर : मुंबई

        मुंबई - नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात २४ जानेवारीला राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये एकूण एकूण ३५ संघटना सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी यावेळी केली. दर दहा वर्षानी होणा-या जनगणनेत सर्व सामाजिक, आर्थिक माहिती समोर येते. मग एनपीआरची वेगळी गरज काय आहे? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


        आंबेडकर म्हणाले, ओबीसी संघटना अनेक वर्षांपासून त्यांच्या जातीनिहाय गणनेची मागणी करीत आहेत. त्यांची ती मागणी मान्य न करता, नॅशनल पॉप्युलेशन सेन्सर केली जात आहे. कोणतेही परिवर्तन टप्प्याटप्प्याने घडवायचे असते. मात्र मोदी सरकारने जीएसटीसारखे निर्णय एका झटक्यात केले. त्यामुळे ते अधिकारी, व्यापारी कोणालाच कळले नाही. नोटबंदी करून काळ्या पैशावर चालणारे अनेक व्यवसाय-रोजगार बंद झाले. त्याचे विपरीत परिणाम आर्थिक स्थितीवर झाले आहेत. 


          देशात आवश्यक खर्च करण्यासाठी किमान १४ लाख कोटी लागतात. सध्या फक्त ११ लाख कोटी जमा झाले आहे. १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प येणार आहे. तोपर्यंत ३ लाख कोटींची ही तूट भरून निघेल असे वाटत आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंकसेवक संघ आणि भाजप देशाला आर्थिक दिवाळखोरीकडे नेत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. देशात अशी परिस्थिती असताना विरोधक सरकारला हवा तसा तीव्र विरोध करीत नाही. त्यामुळेच २४ जानेवारीलाच वंचित बहुजन आघाडीने सीएए आणि एनआरसीला विरोध करणा-या संघटनांसह बंद पुकारणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.  

  

        आंबेडकर म्हणाले, २४ तारखेला बंद शांतपणे पार पडेल. आम्ही लोकांसमोर सर्व स्थिती मंडळी आहे. आता लोकांनी स्वत: ठरवून बंदला पाठींबा द्यावा, असे आम्हाला वाटते. आम्ही बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबदस्ती करणार नाही. देशात सध्या सीएए आणि एनआरसीबद्दल जे आंदोलन सुरू आहे, ते विविध विद्यार्थी संघटना आणि एनजीओ यांनी उभारले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि प्रमुख पक्षांनी स्वता:च्या बळावर आंदोलन करावे. दुस-याच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन फायदे घेऊ नयेत, असेही ते शेवटी म्हणाले. 

मागे

कोकण भवनमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू 
कोकण भवनमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू 

      नवी मुंबई - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार जिल्....

अधिक वाचा

पुढे  

तीन राजधानी असलेले राज्य : आंध्रप्रदेश
तीन राजधानी असलेले राज्य : आंध्रप्रदेश

          आंध्रप्रदेश : भारतामध्ये आंध्रप्रदेश तीन राजधान्य असले....

Read more