By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 18, 2019 10:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नेते मंडळीबरोबर काढलेल्या छायाचित्रांचा गैरवापर होत असल्याचे प्रकार उघडीस आल्याने अशा प्रकारे छायाचित्र पोस्ट करण्यावर आता कडक पावल उचलली जात आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचा चुकीचा किंवा व्यावसायिक वापर केल्यास 1 ते 5 लाख रुपये दंड आणि 6 महिने कारावासाची शिखा होऊ शकते.
आतापर्यंत राष्ट्रीय ध्वजाचा किंवा अशोक चक्राचा चुकीच्या वापरावर 500 रूपयांचा दंड होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्र या छाया चित्रांचा चुकीचा किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापर केल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याची माहिती आहे. या तक्रारी लक्ष्यात घेता, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने चिन्ह आणि नाव (चुकीच्या वापरावर प्रतिबंध कायद्यात) बदल करण्याचा प्रस्ताव दिलाय.
काही दिवसांपूर्वी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म द्वारा डिजिटल इंडिया अभियानाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या फोटोचा वापर करण्यात आला होता. अशाप्रकारच्या कोणत्याही घटना घडू नयेत, यासाठी सरकारकडून कडक नियम करण्यात येणार आहेत.
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचार....
अधिक वाचा