By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 04:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अहमदनगर
सध्या लोकसभा निवडणूकीचा जोरदार प्रचार सुरु असताना निवडणूकीच्या काळात बेकायदा दारु विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदा दारु विक्री करणार्या 22 दुकानांवर कडक कारवाई करण्यात आले आहे व 17 जणांना अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बेकायदा दारू विक्रीवर धडक कारवाई करण्यात येत आहे. शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघात रामनवमी आणि आंबेडकर जयंती या कालावधीत 22 गुन्हे नोंदविण्यात येऊन 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. 24 दारू दुकानांमध्ये जास्त मद्यविक्री झाली असून या दुकानांची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज भाजपमध....
अधिक वाचा