ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदी सरकारमध्ये सुभाष भामरेंची मंत्रिपदी वर्णी लागेल की नाही? धुळ्यात शुकशुकाट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 30, 2019 12:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदी सरकारमध्ये सुभाष भामरेंची मंत्रिपदी  वर्णी लागेल की नाही? धुळ्यात शुकशुकाट

शहर : धुळे

आज शपथ घेणाऱ्या मोदी सरकारमध्ये मंत्रिपदी कोणाची वर्णी लागेल? याबाबत किती कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. याचा अनुभव धुळ्यामध्ये पाहायला मिळत आहे. मागच्या सरकारमध्ये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री असलेल्या डॉक्टर सुभाष भामरे यांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. डॉक्टर भामरे पुन्हा मंत्री होतील की नाही? याबाबत कुठलीही माहिती समोर येत नसल्यामुळे त्यांच्या कार्यालयात नेहमी कार्यकर्त्यांचा जो राबता दिसतो तो दिसून येत नाही.कार्यकर्त्यांना आणि कुटुंबीयांना डॉक्टर भामरे यांच्या मंत्रिपदाबाबत कुठलीही माहिती दिसून येत नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जल्लोषासाठी जी तयारी करावी लागते त्याचाही लवलेश डॉक्टर भामरे यांच्या कार्यालयात कुठेही दिसून येत नाही. असे असले तरी उत्तर महाराष्ट्रातून डॉक्टर भामरे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि शाह यांची मर्जी आणि अनुभव या दोन बाबी डॉक्टर भामरे यांच्या मंत्रिपदासाठी अनुकूल आहे.

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानाचा दुसरा कार्यकाळ आजपासून सुरू होतोय. आज संध्याकाळी वाजता मोदी पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. देशविदेशातल्या पाहुण्यांना या शपथविधीसाठी निमंत्रण धाडण्यात आलेत. मोदींबरोबर ६५ ते ७० मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यात

३५ टक्के तरूण चेहरे तर महिलांनाही प्रतिनिधित्व मिळणार आहे. मंत्रिमंडळात प्रादेशिक समतोल राखला जाईल. पश्चिम बंगाल, ओडिशामधली पक्षाची कामगिरी पाहता या राज्यांना मंत्रिमंडळात झुकतं माप दिलं जाईल, असं दिसतंय.

 

 

मागे

गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच
गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत अडचणी वाढल्या आहेत. क....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद; 'मातोश्री'कडून अरविंद सावंत यांच्या नावावर मोहोर
शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद; 'मातोश्री'कडून अरविंद सावंत यांच्या नावावर मोहोर

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवल्....

Read more