By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 07:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा चेहरा म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक सुभाष देसाई होय. सुभाष देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्वात जवळच्या नेत्यांमधले मानले जातात. बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेला नेता ही देसाईंची जमेची बाजू आहे. शिवाय बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेला सावरण्यात उद्धव ठाकरेंना ज्यांचा मोठा आधार मिळाला, त्यात देसाईंचं नाव सर्वात आघाडीवर आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून सुभाष देसाई शिवसेनेचा मुंबईतला महत्वाचा चेहरा आहेत. जे गोरेगाव, समाजवादी नेत्या मृणाल गोरेंचं गोरेगाव म्हणून ओळखलं जायचं, त्याच गोरेगावात सुभाष देसाईंनी शिवसेना रुजवली. त्यांना एकनाथ शिंदेंइतका मास बेस नसला तरी संघटनात्मक बांधणीवर त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.
1990 मध्ये देसाई पहिल्यांदा आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून गोरेगाव मतदारसंघातून निवडून आले. 2014 मध्ये देसाईंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला, परंतु फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योग मंत्रालयाची धुरा देण्यात आली होती. तर मुंबईचं पालकमंत्रिपदही देसाईंकडे सोपवण्यात आलं. 2015 मध्ये सुभाष देसाईंना विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं.
सुभाष देसाई यांची माहिती
सुभाष देसाई- (गोरेगाव)
पक्ष – शिवसेना
वय – 73 वर्षे
शिक्षण – 10 वी उत्तीर्ण
संपत्ती – एकूण 8 कोटी
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन....
अधिक वाचा