By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 02:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचार्यांना राज्य सरकारने खुशखबर देत महागाई भत्यात तीन टक्के वाढ केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र पूर्ण कालिक कर्मचार्यांचा महागाई भत्ता आता 9 टक्क्यावरून 12 टक्के झाला आहे, अशी माहिती अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्य शासनाच्या अर्थ विभागाकडून 8 जुलै 2019 रोजी जारी झालेल्या पत्रकात नमूद केल आहे. की, 1 जानेवारी 2019 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्याचा दर 9 टक्क्यावरून 12 टक्के करण्यात यावा. तसच महागाई भत्याची वाढ 1 जुलै 2019 पासून रोखीने देण्यात यावी. 1 जानेवारी ते 30 जुने 2019 या सहा महिन्यातील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश दिले जातील, अस या पत्रकात नमूद करण्यात आल आहे.
भारतच्या राजकरणात अनेक असे नेते होऊन गेले ज्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण ....
अधिक वाचा