By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2019 02:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून राज्यात घडलेल्या राजकीय उलथापालथीत शिवसेनेची भूमिका नेटाने मांडणारे आणि महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात महत्वाची भूमिका निभावणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या ते अज्ञातस्थळी असल्याचे बोलले जात आहे.
नाराज असलेले सुनील राऊत यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्या ३१ डिसेंबरला ते विधानसभा अद्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्त करणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, परांडा मतदारसंघातील शिवसेना आमदार तानाजी सावंतही नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिपद मिळावे म्हणून ते मातोश्रीवर ठाण मांडून बसले होते. पण त्यांची निराशा झाली. अशाप्रकारे एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तरा होत असताना शिवसेना नेत्यांचे नाराजी नाट्य सुरू झाल्याचे दिसत आहे.
मुंबई - आज उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा लांबलेला शपथविधी पार पडत आ....
अधिक वाचा