By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 12:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
बॉलिवूड अभिनेता सनी देओल भाजपामध्ये दाखल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहे. सनी देओलनं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची पुणे एअरपोर्टवर १९ एप्रिल रोजी धावती भेट घेतली होती.
पंजाबमध्ये भाजप, शिरोमणि अकाली दलासोबत युती करत राज्यातील तीन मतदारसंघात निवडणूक लढणार आहे. अमृतसर, गुरुदासपूर आणि होशियारपूरमधून भाजप आपले उमेदवार उभे करत आहे.
सनी देओलचे पिता धर्मेंद्र यांनी २००४ साली भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली होती. राजस्थानच्या बिकानेरमधून त्यांनी मोठा विजय संपादन केला होता. तसंच याच कुटुंबातून अभिनेत्री हेमा मालिनी यादेखील भाजच्या खासदार आहेत. हेमामालिनी यंदा मथुरातून निवडणुकीच्या मैदानात आहेत.
गुरुदासपूर मतदारसंघाचा इतिहास
सनी देओल लढणार असलेल्या गुरुदासपूर या मतदारसंघातून याअगोदर दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी निवडणूक लढवली होती. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर ही जागा रिकामीच होती. यापूर्वी या जागेवर विनोद खन्ना यांची पत्नी कविता यांच्या नावाचीही चर्चा होती. परंतु, हे नाव मागे पडलं आणि आता सनी देओलला ही संधी मिळणार असं दिसतंय.
विनोद खन्ना १९९७ मध्ये भाजपामध्ये दाखल झाले होते. १९९८ साली गुरुदासपूरहून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढली आणि ते जिंकूनही आले. १९९९ आणि २००४ सालीही विनोद खन्ना यांचाच विजय झाला. २००९ साली त्यांनी ही जागा गमावली परंतु, २०१४ मध्ये पुन्हा एकदा विनोद खन्नाच गुरुदासपूरचे खासदार बनले होते.
लोकसभा निवडणूकीच्या तिसर्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. आज स....
अधिक वाचा