By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 24, 2019 09:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापून ओमराजे निबांळकर यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गायकवाडांचे समर्थक खूप नाराज झाल्याचे दिसत आहे. या नाराजीतूनच गायकवाड समर्थक आपले राजीनामे देण्यासाठी मातोश्रीवर येत असताना कार्यकर्त्यांना दादर व वाशी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5 वर्षात खासदारांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी शेकडो कार्यकर्ते उस्मानाबादहून मुंबईत दाखल झाले होते. परंतु या सर्व कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी वाशी टोल नाक्यावर अडवल्या आणि या कार्यकर्त्यांना तेथून परत पाठवले आहे.
एकीकडे कोल्हापुरात महायुतीची सभा होत असताना कराडमध्ये काँग्रेस महाआघाड....
अधिक वाचा