By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 10:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने भाजपच्या सत्तास्थापनेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाचे दारं ठोठावली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने रविवारी सुनावणी करतानासर्व पक्षकारांना नोटीस देत त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं. न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना राज्यपालांकडील बहुमताची कागदपत्रं सादर करण्याचेही निर्देश दिले. राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी दिलेल्या निमंत्रणाचे पत्र आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी संख्याबळ असल्याचा दावा करणारे पत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यावर आज सुनावणी होत आहे.
महाराष्ट्र सत्तासंघर्ष – सुप्रीम कोर्ट LIVE
तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर पत्रं मांडली
अजित पवारांची बाजू मनिंदर सिंह मांडणार
वरिष्ठ वकील मुकूल रोहतगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू मांडणार
कोर्टात भयानक गर्दी, पाय ठेवायलाही जागा नाही
अभिषेक मनू सिंघवी पोहचले
तिन्ही न्यायाधीश कोर्टात पोहचले
कपिल सिब्बल कोर्टात पोहचले- महाविकास आघाडीची बाजू मांडणार
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपला आमंत्रण देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राज्यपालांच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे.
या प्रकरणाची शनिवारी रात्रीच सुनावणी व्हावी, अशी अशी विनंती ‘महाविकासआघाडी’तील तिन्ही पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र रविवारी सुनावणी घेण्यात आली.
आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक किमान 145 आमदारांचे पाठबळ होते. आम्ही सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत होतो. मात्र राज्यपालांनी भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं आणि शपथविधी सोहळा आयोजित केला. हा निर्णय घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेत नमूद केलं आहे.
महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारला तात्काळ विशेष विधिमंडळ अधिवेशन घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील,....
अधिक वाचा