ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय

शहर : देश

देवेंद्र फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही. त्याचं लाईव्ह चित्रीकरण करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

सुप्रीम कोर्टाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

27 नोव्हेंबर संध्या. 5 पर्यंत बहुमत सिद्ध करा

गुप्त मतदान नको

लाईव्ह चित्रीकरण करा

बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबतचा महानिकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला. सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर, तात्काळ बहुमत चाचणी घेण्याची मागणी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात केली होती त्याबाबत रविवार आणि सोमवार अशा दोन्ही दिवस दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला.  शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपआपली बाजू मांडली.

काल कोर्टात काय झालं?

काल सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली. वकील तुषार मेहता यांनी कोर्टाच्या मागणीप्रमाणे आज ज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी दिलेल्या निमंत्रणाचे पत्र आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी संख्याबळ असल्याचा दावा करणारे पत्र सादर केलं. त्यानंतर  ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी आक्रमकपणे भाजपची बाजू मांडली. तुषार मेहता आणि मुकूल रोहतगी यांनी राज्यपालांनी सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे आणि उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करुनच केल्याचा दावा केला. शिवाय विश्वासदर्शक ठरावाची तातडीने गरज नाही, सुप्रीम कोर्ट तसे आदेश देऊ शकत नाही, विधानसभा कामकाज हे विधीमंडळ नियमानुसार चालतं त्यामुळे कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही, असा युक्तीवाद रोहतगी यांनी केला.

यावर शिवसेना वकील कपिल सिब्बल आणि राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद करताना, भाजपकडे जर बहुमत आहे तर विश्वासदर्शक ठरावापासून पळ का काढत आहे, अशी विचारणा केली. तसंच तातडीने आजच्या आज विश्वासदर्शक ठराव घ्यावा, भलेही आम्ही विश्वासदर्शक ठरावात हरु, पण तो आजच घ्या अशी मागणी कोर्टाकडे केली.

मागे

काँग्रेसच्या बड्या नेत्यानेच उडवली महाविकासआघाडीच्या फ्लोअर टेस्टची खिल्ली, म्हणाले...!
काँग्रेसच्या बड्या नेत्यानेच उडवली महाविकासआघाडीच्या फ्लोअर टेस्टची खिल्ली, म्हणाले...!

राजकीय घडामोडींमुळे सध्या राज्यात वातावरण ढवळून निघालं आहे. अशात शिवसेना, ....

अधिक वाचा

पुढे  

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अत्यंत महत्त....

Read more