ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु

शहर : मुंबई

देवेंद्र फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही, त्याचं लाईव्ह चित्रीकरण करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

सुप्रीम कोर्टाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

27 नोव्हेंबर संध्या. 5 पर्यंत बहुमत सिद्ध करा

गुप्त मतदान नको

लाईव्ह चित्रीकरण करा

बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा

 बहुमत सिद्ध करुन दाखवूचंद्रकांत पाटील

कोर्टाच्या निकालाचा आदर करतो, उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवूचंद्रकांत पाटील

हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण कोण?

सूत्रांच्या माहितीनुसार, हंगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी (प्रोटेम स्पीकरसाठी)  17 विधानसभा सदस्यांची नावं सचिवालयातून राज्यपालांना सुपूर्द करण्यात आली आहेत. यामध्ये भाजपचे हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे  बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील, के सी पाडवी (काँग्रेस, शहादा), काँग्रेसचे कालिदास कोलंबकर, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, भाजपचे विजय कुमार गावित, भाजपचे गिरीष महाजन, गोवर्धन शर्मा(भाजप, अकोला), बविआचे हितेंद्र ठाकूर, भाजपचे प्रकाश भारसाखळे (भाजप, अकोट), भाजपचे मंगलप्रभात लोढा, राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबतचा महानिकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला. सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर, तात्काळ बहुमत चाचणी घेण्याची मागणी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात केली होती त्याबाबत रविवार आणि सोमवार अशा दोन्ही दिवस दोन्ही बाजूने युक्तीवाद झालाशिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपआपली बाजू मांडली.  

देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या संध्याकाळी 5 पर्यंतची मुदत, 30 तासांचा अवधी, काऊंटडाऊन सुरु

उद्याच बहुमत चाचणी, फडणवीस सरकारला 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत

 

मागे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अत्यंत महत्त....

अधिक वाचा

पुढे  

अजितदादांचे परतीचे मार्ग बंद, भाजपच्या बैठकीला उपस्थिती
अजितदादांचे परतीचे मार्ग बंद, भाजपच्या बैठकीला उपस्थिती

अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतीचे मार्ग बंद झाले आहेत. भाजप....

Read more