ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुप्रिया सुळे लागल्या कामाला : विधानसभेसाठी बोलावली बैठक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुप्रिया सुळे लागल्या कामाला : विधानसभेसाठी बोलावली बैठक

शहर : पुणे

खासदार झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्याही तयारीला लागल्या असून त्यांनी पुण्यात आल्यावर लगेचच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यांची ही कृती बघता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी आत्ताच कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात पाच खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगमी  विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. याचाच प्रत्यय पुण्यात दिसला असून नवनिर्वाचित खासदार झालेल्या सुळे यांनी शहरात पाऊल ठेवताक्षणीच ग्रामीण आणि शहरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला त्यांच्या मतदारसंघातील सर्व पदाधिकाररी उपस्थित असून स्वारगेट येथील निसर्ग मंगल कार्यालयाजवळील त्यांच्या कार्यालयात ही बैठक झाल्याचे समजते. राष्ट्रवादीला लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी काँग्रेसइतकी त्यांची दाणून हार झालेली नाही. त्यामुळे हाच धागा पकडत मताधिक्य बघून त्यांनी विधानसभा मतदारसंघ टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेली मते आणि स्थानिक सक्षम उमेदवार असे गणित जुळवून लगेच तयारी सुरु केली तर त्यांना चांगला प्रतिसादही मिळू शकतो. हेच सव मुद्दे लक्षात घेत सुळे यांनी बैठक बोलावल्याचे समजते.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्येही निवडणुकीची घोषणा झाली असून त्यासाठीही पक्षाला उमेदवार उभे करायचे आहेत. त्याचीही चर्चा या बैठकीत होणार आहे. शिवाय विधानसभेचीही चर्चा होणार असून उमेवारांच्या नावाची प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

मागे

आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढवावी; युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी
आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढवावी; युवासेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात शिवसेना-भाजपाला प्रचंड प्रमाणात य....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आतापर्यंत 13 वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे
काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरूच; आतापर्यंत 13 वरिष्ठ नेत्यांचे राजीनामे

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीन....

Read more