By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 02:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्कवर संध्याकाळी ६.४० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीआधी सुप्रिया सुळेंनी भावनिक ट्विट केलं आहे. माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात.तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात.तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल.
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019
आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय.महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु.अभिनंदन- उद्धव ठाकरे, असं दुसरं ट्विटही सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय परिस्थितीत गुंता वाढला होता. तेव्हा शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी या घटनेची शरद पवारांना आठवण करुन दिली अशी चर्चा आहे. आपल्या मुलीला तिच्या करिअरच्या सुरुवातीला बाळासाहेबांनी मदत केली. आता बाळासाहेबांचा मुलगा एकटा असताना आपण त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं प्रतिभाताईंनी पवारांना सांगितलं. त्यानंतर पवारांचा निर्धार आणखी पक्का झाला आणि पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा चंगच बांधला.
आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय.महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु.अभिनंदन -@OfficeofUT
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019
एकेकाळी सुप्रिया सुळे निवडणुकीला उभ्या असताना त्या बिनविरोध निवडून याव्यात यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना हमी दिली होती. बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांना दिलेला हा शब्द पाळला. त्याच धर्तीवर आज बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे राजकारणाच्या या रिंगणात एकटे पडताना दिसत असतानाच त्याचा आधार होण्याचा आग्रह खुद्द प्रतिभा पवार यांनी धरल्याचंही म्हटलं जात आहे. परिणामी शिवसेनेच्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे राहिले आणि महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा एकदा बहुमत, निवडणुका, मतभेद, मनधरणी यांच्यासमवेत नात्यांच्या बळावरही लढलं गेलं असं म्हणायला हरकत नाही.
शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन....
अधिक वाचा