By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 09:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले, असा दावा मुंबई पोलिसांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी बोलताना चिंता व्यक्त करत एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर 80 हजार बनावट अकाऊंट्स तयार करून त्याचा राजकारणासाठी वापर करणं हे अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एखाद्याच्या मृत्यूनंतर 80 हजार फेक अकाऊंटस काढण्यात आली आणि एका पक्षाने त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न केला. हे चित्रच निव्वळ धक्कादायक आणि किळसवाणं आहे”
मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सायबर सेलने आयटी कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी सुरु केली आहे. मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सुरु असलेल्या अभियानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता सायबर सेल या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु करत आहे, असं मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीपाठोपाठ एनडीएनेही जागा वाट....
अधिक वाचा