ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माझा दादा परत आलाय - सुप्रिया सुळे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माझा दादा परत आलाय - सुप्रिया सुळे

शहर : मुंबई

आज विधानसभेचे विशेष अधिवेशन होत आहे. सकाळी आठ वाजता नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी होत आहे. महाराष्ट्र विकासआघाडीचे आमदार विधानभवनाकडे रवाना झालेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या परतीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा हा माझा दादा आहे. भावा बहिणीचे नाते तुटायला नको. माझा दादा परत आला आहे असून सांगून राष्ट्रवादीच्या आमदारांचा संघर्ष, ऐक्याचा सार्थ अभिमान असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्यात. त्याचवेळी त्यांनी विधिमंडळात अजित पवार गळाभेट घेतली. त्यामुळे बहीण-भावाचे नाते संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले आहे. आपले कुटुंब एक आहे, हेच दाखवून दिले.

तसेच पवार कुटुंबात कोणतेही मतभेद नसून सगळे काही ठीक आहे, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्यात, येत्या पाच वर्षांत जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू. नवनविर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार असून त्यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे सकाळीच विधानभवनात दाखल झाल्या आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदारांनी ऐक्य दाखवले याचा सार्थ अभिमान असल्याचे त्या म्हणाल्यात. गेल्या काही दिवसांपासून आमदारांच्या मनातही संघर्ष सुरु होता. त्यांची मनस्थिती मी समजू शकते. मी आमदारांचे स्वागत करण्यासाठी आले आहे.

आज राज्यासमोर अनेक आव्हाने आहेत. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहेत्यासाठी जे लागतील ते कष्ट करु. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना विरोधातील आवाज दाबण्याचं काम आम्ही कधी करणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

 

मागे

पवारांना घरातील व्यक्तीनं सुचवलं मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांचे नाव
पवारांना घरातील व्यक्तीनं सुचवलं मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांचे नाव

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग शरद पवारांनी मोकळा केला. उद्धव ठाकर....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवार ने बुलाई NCP की बैठक, अजित पवार को उपमुख्यमंत्री बनाने की तैयारी: सूत्र
शरद पवार ने बुलाई NCP की बैठक, अजित पवार को उपमुख्यमंत्री बनाने की तैयारी: सूत्र

महाराष्ट्र में लंबे राजनीतिक गतिरोध के बाद अब तीन दलों के गठबंधन की सरकार बन....

Read more