By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2019 08:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात सेकंदात घडामोडींना नवे वळण येत आहे. यात खासदार सुप्रिया सुळे 23 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअॅप स्टेटसवरून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितींचा उलगडा होत आहे. आज सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांबद्दल आदर व्यक्त करत अजित पवारांवर टीका केली.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये, “ते हरतील किंवा जिंकतील पण शरद पवार एक मराठा लढवय्याप्रमाणे या युध्दात लढत आहेत. मग मोदी-शाहांचे राजकारण, कुटुंबातील गद्दारी किंवा त्यांचे वय आणि आरोग्या. त्यांनी वेळोवेळी सर्वांवर मात दिली आहे. अशी इच्छाशक्ती मी कधीच ऐकली नाही”, असे म्हणत मुलगी म्हणून त्यांना अभिमान आहे असे मत व्यक्त केले.
तर, याआधी सुप्रिया यांनी, “I believe…power comes and goes…only relationship matter…”, असे स्टेट्स ठेवले आहे. सुळे यांनी या मजकुरातून, ‘मला वाटतं सत्ता येते जाते, मात्र नाती कायम राहतात’, असे म्हणत आपले दु:ख व्यक्त केले. यावरून पवार कुटुंबात फूट पडल्याचं त्यांनी मान्य केल्याचं यावरून दिसतं. याआधी त्यांनी, "माझ्या आयुष्यातले सध्या कठिण प्रसंग आहेत. हे प्रसंग मला मजबूत करत आहेत. प्रत्येकाचे आभार ज्यांनी कठिण प्रसंगी मला साथ दिली”, असे म्हणत कार्यकर्त्यांचेही आभार मानले.
याआधी अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टेटसवर टाकलेला मेसेजची चर्चा होती असं त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं.
सुप्रिया सुळेंनी आदित्य, रोहित पवार आणि संजय राऊतसोबत शेअर केला फोटो
आज दुपारी सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि संजय राऊत यांच्यासोबत फोटो ट्वीट केला.
With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019
याआधी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसात केलेल्या भाषणाचा फोटोही टाकला होता. दरम्यान आज त्यांना आदित्य आणि रोहित पवार यांच्यासोबतच्या फोटोनं चर्चा झाली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाने सरकारस्थापनेचा दावा ....
अधिक वाचा