ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

त्याने केजरीवालांच्या कानाखाली का मारली; सविस्तर वाचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अरविंद केजर

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 11:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

त्याने केजरीवालांच्या कानाखाली का मारली; सविस्तर वाचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अरविंद केजर

शहर : delhi

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अरविंद केजरीवालांच्या एका तरुणाने सणसणीत कानाखाली मारली होती. हा तरूण कोण होता हे कळू शकलं नव्हतं. आता त्याची ओळख पटली असून त्याला सगळे जण एकच प्रश्न विचारत आहेत की तू केजरीवालांच्या कानाखाली का मारलीस?
सुरेश असं या तरुणाचं नाव असून त्याने 4 मे रोजी केजरीवाल खुल्या जीपमधून प्रचार करत असताना हात मिळवण्याच्या बहाण्याने जवळ जात कानाखाली मारली होती.

यानंतर सुरेशला आपच्या कार्यकर्त्यांनी चोपला होता आणि पोलिसांच्या ताब्यात दिला होता. पोलिसांनी मारहाण केली का असा प्रश्न सुरेशला विचारला असता त्याने याचं नकारार्थी उत्तर दिलं. सामान्य माणसांप्रमाणेच त्यांनीही मला हाच प्रश्न विचारला की तू कानाखाली का मारलीस ? असं सुरेश म्हणाला आहे. दिल्लीतील मोतीनगर भागात झालेल्या या प्रकारामागचं खरं कारण काय असं सुरेशला सातत्याने विचारण्यात आलं असता त्याने सांगितलं की मी कानाखाली का मारली याचं कारण मलाच माहिती नाहीये घडल्याप्रकाराबद्दल मला खेद वाटतोय असंही सुरेश म्हणाला. सुरेश हा विशिष्ट राजकीय पक्षाचा समर्थक असावा असा आपच्या कार्यकर्त्यांना संशय होता. मात्र आपण कोणत्याही पक्षाशी निगडीत नसल्याचं सुरेशने म्हटलंय.
 

मागे

आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सचा काँग्रेसने चुकीचा वापर केला- निर्मला सितारामन
आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सचा काँग्रेसने चुकीचा वापर केला- निर्मला सितारामन

काँग्रेसने आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्सचा चुकीचा वापर केला आहे, पण ते आमच्याव....

अधिक वाचा

पुढे  

तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान होऊच दिलं नसते: मायावती
तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान होऊच दिलं नसते: मायावती

राजकीय स्वार्थासाठी आपण मागास जातीचे असल्याचं ढोंग मोदी करत आहेत, असा घणाघ....

Read more