ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुशांतप्रकरण भाजपकडून हायजॅक; अमेरिकेच्या विद्यापीठाचा दावा: अनिल देशमुख

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुशांतप्रकरण भाजपकडून हायजॅक; अमेरिकेच्या विद्यापीठाचा दावा: अनिल देशमुख

शहर : मुंबई

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण भाजपने हायजॅक करून त्याला वेगळं वळण दिल्याचा दावा अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाने केला आहे, असं सांगतानाच महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी भाजप आणि इतरांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुशांतप्रकरणावर भाष्य करतानाच भाजपवर टीकास्त्र सोडलं. अमेरिकच्या मिशिगन विद्यापीठानेही सुशांतप्रकरणाचा अभ्यास करून त्यावर अहवाल दिला आहे. भाजपने हे प्रकरण हायजॅक केलं. त्याला वेगळं वळण देऊन हे प्रकरण वेगळ्याच दिशेला नेलं. त्याशिवाय काही मीडियानेही या प्रकरणाला वेगळं वळण दिलं असून या मीडियांची नावंही या अहवालात देण्यात आली असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

सुशांतप्रकरणाचं निमित्त पुढे करून एका राजकीय पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी उचलली होती. महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्या देण्याचं काम करण्यात आलं. बाहेरच्या राज्यातील कठपुतलींनाही आपल्या तालावर नाचावण्याचं काम या पक्षाने केलं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा प्रोफेशनली तपास केल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तरीही राज्याचं पाच वर्षे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला. मुंबई पोलिसांनी योग्य दिशेनं तपास केला नसल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी केलं, अशी टीका देशमुख यांनी केली.

फडणवीस पांडेंचा प्रचार करणार का?

बिहारजे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची बदनामी केली. आता ते निवडणूक लढवत आहेत. देवेंद्र फडणवीस या पांडेंचा प्रचार करणार आहेत का?, असा सवालही त्यांनी केला.

सीबीआयने अहवाल द्यावा

एम्स आणि कूपर रुग्णालयाने आपला अहवाल दिला आहे. या अहवालातून सुशांतची हत्या झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच सुशांतच्या शरीरात विष नसल्याचंही आढळून आलं आहे. त्यामुळे सीबीआयने आपला अंतिम अहवाल तात्काळ द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

 

मागे

आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल
आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल

एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत....

अधिक वाचा

पुढे  

गृहमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या सर्कशीतील जोकर होऊ नये, भाजपचा घणाघात
गृहमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या सर्कशीतील जोकर होऊ नये, भाजपचा घणाघात

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शवविच्छेदन अहवाल अद्याप अधिकृत झालेला नसताना ....

Read more