By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 06, 2019 12:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधनाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राहुल यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. राहुल यांनी बोलताना आपली मर्यादा पाळावी अशा शब्दांत स्वराज यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहे. आडवाणी हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य करताना राहुल गांधी यांना संयम पाळावा तसेच शब्दांकडे लक्ष द्यावे, असेही सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
चंद्रपूरमधील जाहीर सभेत राहुल यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा पंतप्रधान मोदी आणि भाजपने अपमान केल्याचे सांगितले होते. ‘हिंदू धर्मात गुरू-शिष्याच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. आडवाणी हे मोदींचे गुरू आहेत. मात्र, गुरू अचनाक समोर आल्यावर मोदी त्यांची दखलही घेत नाहीत. मोदींनी आडवणींना जोडे मारून स्टेजवरून खाली उतरवले आहे,’ असे वादग्रस्त विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सुषमा स्वराज यांनी ट्विट करून राहुल यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आडवाणी आम्हाला पित्यृतुल्य आहेत. राहुल यांनी आडवाणींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. राहुल यांनी बोलताना संयम पाळावा असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीला आज 39 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरें....
अधिक वाचा